Rohit Sharma: पाहिलं, हेरलं, थांबला...शिवरायांचा फोटो पाहताच रोहित शर्माने काय केलं?, सर्वांची जिंकली मनं!
आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या हस्ते कुदळ मारून राशीन येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल भूमिपूजन करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्मा येथे क्रिकेट अकॅडमी सुरू करत आहेत. ग्रामीण भागतील रोहित शर्मा यांची ही पहिलीच अकॅडमी आहे, जी रयत शिक्षण संस्थेच्या जागेत असणार आहे.
सदर भूमिपूजन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण आणि खेळाडू राशीन येथे हजर होते. रोहित शर्माने यावेळी उपस्थित असणाऱ्यांसोबत मराठी संवाद साधला. कसं काय कर्जत-जामखेडकरांनो...असं रोहित शर्माने विचारलं.
यापुढे रोहित शर्माने मराठीतूनच भाषण केलं. मागच्या तीन-चार वर्षांसोबत झालं. आम्ही टी-20 विश्वचषक जिंकलो. आमचं विश्वचषक जिंकणं हे खूप महत्वाचं होतं.
विश्वचषक जिंकल्यानंतर आमच्या जिवात जीव आला, असं विधान रोहित शर्माने केलं.
रोहित शर्मा हा व्यासपिठावर आल्यावर सुरवातीला व्यासपीठावरील ठेवलेल्या सर्व पूजनीय असलेल्या महान व्यक्तींचे फोटो लावले होते.
सदर फोटोंना नमस्कार करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
यावेळी क्रिकेटपटू रोहित शर्मा याने तत्काळ आपले पायातील बूट काढून सर्व महामानवांच्या फोटोला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
रोहित शर्माच्या या कृतीचं कौतुक होत आहे.