IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मॅच पावसानं रद्द झाल्यास अफगाणिस्तानला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार का?जाणून घ्या समीकरण
सेंट लूसिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया आज सुपर 8 मध्ये आमने सामने येणार आहेत. ही मॅच सेंट लूसियाच्या डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये होणार आहे. अफगाणिस्ताननं पराभूत केल्यानं ऑस्ट्रेलियासाठी आजच्या मॅचचं महत्त्व वाढलेलं आहे. भारताविरूद्धची मॅच ऑस्ट्रेलियासाठी निर्णयाक ठरणार आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास अफगाणिस्तानच्या आशा कायम राहतील. दुसरीकडे आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत उपांत्य फेरीच्या लढतीत पोहोचण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाचा असेल. पावसामुळं आजची मॅज रद्द झाल्यास अफगाणिस्तानच्या आशा देखील कायम राहतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगानिस्तान, बांगलादेश सुपर 8 मध्ये ग्रुप -1 मध्ये आहेत. भारतानं आतापर्यंत दोन मॅच जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्ताननं प्रत्येकी एक मॅच जिंकली आहे. भारताकडे चार गुण आहेत तर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानकडे 2-2 गुण आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश अशा दोन लढती बाकी आहेत.
पहिलं समीकरण : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅच पावसामुळं रद्द झाल्यास दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल. भारताचे पाच गुण होतील. ऑस्ट्रेलियाकडे तीन गुण होतील. अफगाणिस्ताननं अखेरच्या मॅचमध्ये बांगलादेशला पराभूत केल्यास त्यांचे चार गुण होतील. यामुळं भारत आणि अफगाणिस्तान सेमी पायनलमध्ये जातील.
दूसरं समीकरण: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅच पावसामुळं रद्द झाल्यास दोन्ही संघांकडे अनुक्रमे 5 आणि 3 गुण असतील. बांगलादेशनं अफगाणिस्तानला पराभूत केल्यास ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचा मार्ग खुला असेल.
भारतानं सुपर 8 मधील दोन मॅच जिंकल्या आहेत. अफगाणिस्तान आणि बांगलादेशला भारतानं पराभूत केलंय. त्यामुळं भारताकडे चार गुण आहेत. अफगाणिस्तान विरूद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियासाठी उपांत्य फेरीचा प्रवास खडतर बनला आहे.