T20 World Cup 2026: यशस्वी, केएल, ऋषभ, युझवेंद्र...टी-20 विश्वचषकासाठी निवड न झालेल्या खेळाडूंची चक्रावणारी Playing XI

T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषकासाठी अनेक खेळाडूंना संधी मिळाली नाही. टी-20 विश्वचषकासाठी निवड न झालेल्या खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन तयार केल्यास एक भक्कम संघ तयार होतो.

Continues below advertisement

T20 World Cup 2026

Continues below advertisement
1/9
T20 World Cup 2026: आगामी टी-20 विश्वचषक 2026 साठी (T20 World Cup 2026) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडक अजित आगरकर पत्रकार परिषद घेऊन सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली.
2/9
7 फेब्रुवारी 2025 पासून टी-20 विश्वचषक 2026 चा थरार (T20 World Cup 2026) रंगणार असून 8 मार्च 2026 पर्यंत ही स्पर्धा खेळवण्यात येईल. भारत आणि श्रीलंका यंदाच्या टी-20 विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत (T20 World Cup 2026) 30 दिवसांत 55 सामने खेळवण्यात येणार असून 20 संघ निश्चित करण्यात आले आहे.
3/9
T20 विश्वचषक स्पर्धेसाठी अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, इशान किशन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा यांची निवड करण्यात आली आहे.
4/9
टी-20 विश्वचषकातून शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. तर अनेक खेळाडूंना यंदाही टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाकडून संधी मिळाली नाही. टी-20 विश्वचषकासाठी निवड न झालेल्या खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन तयार केल्यास एक भक्कम संघ तयार होतो.
5/9
टी-20 विश्वचषक 2026 साठी टीम इंडियाच्या संघात निवड न झालेल्या खेळाडूंसह प्लेइंग इलेव्हन पाहिल्यास हा संघ कोणालाही पराभूत करु शकतो असेल दिसून येते.
Continues below advertisement
6/9
गेल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या संघात एक प्रयोग करण्यात आला होता, ज्यामध्ये दोन्ही विकेटकीपर खेळत होते. त्यापैकी एक जितेश शर्मा होता, जो बराच काळ संघासोबत होता पण शेवटच्या क्षणी त्याला स्थान मिळाले नाही. निवड न झालेल्या खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये, केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावर, जितेश शर्माला चौथ्या क्रमांकावर आणि ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर विकेटकीपर म्हणून समाविष्ट केले जाऊ शकते.
7/9
नितीश कुमार रेड्डी यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पदार्पण करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीने जानेवारी 2025 मध्ये शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
8/9
युझवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई हे दोन फिरकीपटू असू शकतात. युझवेंद्र चहल हा खूप अनुभवी गोलंदाज आहे. तर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे दोन वेगवान गोलंदाज असतील.
9/9
टी-20 विश्वचषकासाठी निवड न झालेल्या खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन- यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, जितेश शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
Sponsored Links by Taboola