Virat Kohli : जेव्हा तुम्ही सलग तीन वेळा कमी धावा करता.., सुनील गावसकर विराट कोहलीबद्दल नेमकं काय बोलून गेले...
टीम इंडियानं यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये प्रयोग करत अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्माला सलामीला पाठवलं आहे. आतापर्यंत पहिल्या तीनमध्ये या प्रयोगाला यश आलं नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविराट कोहलीला आयरलँड, पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं आहे. विराट कोहलीच्या या कामगिरीमुळं त्याचे चाहते निराश झाले आहेत.
विराट कोहलीनं आयपीएलमध्ये सलामीला दमदार कामगिरी केल्यानं त्याला टी20 वर्ल्ड कपमध्ये सलामीला पाठवण्यात येत आहे. मात्र पहिल्या तीन मॅचमध्ये तो दुहेरी धावसंख्या देखील गाठू शकला नाही.
विराट कोहलीनं आयरलँड विरुद्ध एक रन, पाकिस्तान विरुद्ध 4 धावा केल्या.अमेरिकेविरुद्ध तो शुन्यावर बाद झाला आहे.
टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी मात्र विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे. विराट कोहलीवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे, असं त्यांनी म्हटलंय.
जेव्हा तुम्ही सलग तीन मॅचमध्ये कमी धावा करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही चांगली फलंदाजी करत नाही. कधी कधी तुमच्यासमोर चांगला बॉल येतो. कधी कधी तो बॉल वाईड असू शकतो, तो बॉल स्लीपवरुन चौकार जाऊ शकतो. आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल, तो आज नाही तर उद्या चांगल्या फॉर्ममध्ये येईल, असं सुनील गावसकर म्हणाले.