Team India : रोहितसेना वनडे वर्ल्ड कप फायनलचा हिशोब चुकता करण्यासाठी लढणार, ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवणार?
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 8 मधील ग्रुप 2 मधून इंग्लंडनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ग्रुप 1 मधून आतापर्यंत कोणताही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेला नाही. भारत,ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान सुपर 8 च्या शर्यतीत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत दोन विजयांसह 4 गुण मिळवत पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया तर तिसऱ्या स्थानी अफगाणिस्तान आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाला पराभूत करत ऑस्ट्रेलियानं वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. आज त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.
अफगाणिस्ताननं 21 धावांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत करत इतिहास रचला होता. आता भारताकडे देखील ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची संधी आहे. वनडे वर्ल्ड कपमधील अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेण्याची संधी देखील रोहित शर्माच्या भारतीय संघाकडे आहे.
रोहित शर्मानं कुलदीप यादव वगळता संघात नव्यानं संधी दिली नाही. आजच्या मॅचमध्ये देखील रोहित शर्मा बांगलादेश विरुद्धच्या संघासह ऑस्ट्रेलिया विरुद्ध लढू शकतो.
अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत वनडे वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेतला आहे. आता भारतीय संघानं देखील ऑस्ट्रेलियाला पराभूत करत हिशोब चुकता करावा अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केलीय. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत यांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल.