Photo: बीसीसीआयचा मोठा निर्णय; चेतन सकारियासह तीन स्टार गोलंदाज ऑस्ट्रेलियात दाखल
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबरपासून आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
T20 World Cup 2022
1/10
आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेसाठी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहचलाय.
2/10
यातच भारताचे युवा गोलंदाज चेतन सकारिया (Chetan Sakariya), मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) आणि सौरभ कुमार (Saurabh Kumar) ऑस्ट्रेलियात दाखल झाल्याची माहिती समोर आलीय.
3/10
हे तिघंही टी-20 विश्वचषकात महत्वाची भूमिका बजावणार असून त्यांचा नेट गोलंदाज म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आलाय.
4/10
सौराष्ट्राचा डावखुरा गोलंदाज चेतन सकारियाची भारताच्या टी-20 विश्वचषक संघात नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आलीय.
5/10
चेतन सकारियानं आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केलीय. तसेच त्याला ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर अनेक सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यानं केएफसी टी-20 लीगमध्ये सनशाईन कोस्टच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय, ज्याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो.
6/10
आयपीएलच्या मागच्या हंगामात मुकेश चौधरीनं महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधित्व केलंय. या हंगामात मुकेशनं दमदार गोलंदाजी केली होती. आयपीएलच्या 13 सामन्यात त्यानं 16 विकेट्स घेतल्या.
7/10
मुकेश चौधरीला ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीचा चांगली माहिती आहे. अलीकडच्या काळात भारतीय संघ डावखुऱ्या गोलंदाजासमोर संघर्ष करताना दिसलाय. अशात सकारिया आणि मुकेश चौधरी यांच्यामुळं भारतीय संघाला मोठी मदत मिळू शकते.
8/10
मुकेश चौधरी हा भारतीय संघातील दुसरा नेट गोलंदाज आहे. मुकेश चौधरीला ऑस्ट्रेलियातील टी-20 मॅक्स सिरीजमध्ये खेळण्याचा अनुभव आहे.
9/10
उत्तर प्रदेशचा गोलंदाज स्पिनर सौरभ कुमारनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केलीय. ज्यामुळं त्याची भारताच्या टी-20 विश्वचषकाच्या नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आलीय.
10/10
सौरभ कुमारनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 52 सामन्यात 222 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामुळं त्याच्यावर भारताच्या टी-20 विश्वचषकाच्या नेट गोलंदाजाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. चेतन सकारिया आणि सौरभ कुमार यांची उमरान मलिक आणि कुलदीप सेन यांच्या जागी टी-20 विश्वचषकासाठी नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आलीय.
Published at : 13 Oct 2022 06:30 PM (IST)