Ind vs NZ: सर्फराज खान की केएल राहुल?; भारतीय प्रशिक्षकाच्या उत्तराने सर्वांना धक्का, दुसऱ्या कसोटीत संधी कोणाला?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. (Photo Credit-BCCI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरु येथे खेळवण्यात आला असून न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. (Photo Credit-BCCI)
पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (Photo Credit-BCCI)
शुभमन गिल दुखापतीमुळे पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही. त्यामुळे मधल्या फळीत सर्फराज खानला संधी देण्यात आली.(Photo Credit-BCCI)
आता शुभमन गिल तंदुरुस्त झाल्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Photo Credit-BCCI)
शुभमन गिल रोहित शर्मासह सलामीला फलंदाजीसाठी उतरेल. त्यामुळे मधल्या फळीतील एक फलंदाज कमी करावा लागेल. (Photo Credit-BCCI)
सर्फराज खान आणि केएल राहुल यांच्यापैकी एकालाच संधी दिली जाईल. सर्फाराज खानने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. तर केएल राहुलला मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. त्यामुळे केएल राहुलला दुसऱ्या सामन्यातून वगळ्यात येईल, असा अंदाज असताना टीम इंडियाचा प्रशिक्षक रायन टेन डॉशहातेच्या विधानाची चर्चा रंगली आहे. (Photo Credit-BCCI)
सर्फराज खान चांगला खेळाडू आहे, पण केएल राहुलला दूर ठेवणे देखील कठीण आहे, असं डॉशहाते म्हणाला. कसोटी क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर केएल राहुलला आणखी एक संधी देऊ शकतो, असंही तो म्हणाला. (Photo Credit-BCCI)