In Pics : महान क्रिकेटपटू शेन वॉर्न यांना अनोखी श्रद्धांजली, सिंधुदुर्गात साकारलं वाळुशिल्प
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न यांचं गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ज्यानंतर संपूर्ण क्रिकेट जगतातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियातच नाही तर संपूर्ण जगात शेन यांचे लाखो चाहते होते. भारतातही शेन वॉर्नचे अनेक चाहते असून सर्वांनीच विविधरित्या श्रद्धांजली वाहिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी शेन वॉर्नचं वाळूशिल्प साकारत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सिंधुदुर्गातील वेंगुर्ले जवळील आरवली समुद्र किनाऱ्यावर हे वाळूशिल्प साकारलं आहे.
सुमारे दीड टन वाळूच्या साहाय्याने हे वाळूशिल्प साकारलं आहे.
रविराज चिपकर हे शेन वॉर्नचे चाहते असल्याचं त्यांनी सांगितलं.
विविध स्तरातील व्यक्तींनी तसचं सर्वच क्रिकेटपटूंनी वॉर्न यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्न यांची ख्याती होती. त्यांच्या जाण्याने क्रिकेट जगताचे मोठे नुकसान झाले आहे.