दिनेश कार्तिक, रोहित शर्मा ते विराट कोहली, टीम इंडियाचे 8 खेळाडू गोल्डन डकचे मानकरी, कुणाच्या नावावर नकोशी कामगिरी
भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोल्डन डक झाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुरली विजय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2010 च्या वर्ल्ड कपमध्ये शुन्यावर बाद झाला होता.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2010 मध्ये शुन्यावर बाद झाला होता.
भारताचे सर्वाधिक खेळाडू गोल्डन डक पाकिस्तान विरुद्ध झाले आहेत. सुरेश रैना 2016 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये शुन्यावर पाकिस्तान विरुद्ध बाद झाला होता.
रोहित शर्मा 2021 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध गोल्डन डक झाला होता.
यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे तीन खेळाडू गोल्डन डक झाले आहेत. रवींद्र जडेजा पाकिस्तान विरुद्ध गोल्डन डक झाला होता.
जसप्रीत बुमराह देखील त्याच मॅचमध्ये गोल्डन डक झाला होता. जसप्रीत बुमराह पाकिस्तान विरुद्ध शुन्यावर बाद झाला.
टीम इंडियाचा आक्रमक खेळाडू विराट कोहली यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अपयशाचा सामना करतोय. अमेरिकेविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहली गोल्डन डक झाला. सौरभ नेत्रावळकरनं त्याला शुन्यावर बाद केलं.