Rohit Sharma : श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लेकीला कधी कडेवर, कधी खांद्यावर बसवलं, रणभूमीवर दिमाखात फिरवलं
युवराज जाधव
Updated at:
30 Jun 2024 01:35 PM (IST)
1
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह टीम इंडियानं दमदार कामगिरी करत भारताला दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप मिळवून दिला. या मॅचनंतर दोघांनी आंतराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रोहित शर्मासह टीम इंडिया सर्व खेळाडू वर्ल्ड कप विजयानंतर भावूक झाले होते. रोहित शर्मानं त्याची लेक समायरला कडेवर घेत बारबाडोसच्या किंग्सटन ओव्हला फेरी मारली.
3
रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कपसाठी सहकुटुंब रवाना झाला होता. पत्नी रितिका सचदेव आणि लेक समायरा प्रत्येक मॅचसाठी मैदानात उपस्थित असायच्या.
4
रोहित शर्मानं लेक समायराला खांद्यावर बसवून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम फेरीसाठी जमलेल्या प्रेक्षकांना अभिवादन केलं.
5
रोहित शर्मानं विजयानंतर पत्नी रितिका सचदेव हिला मिठी मारत आनंद व्यक्त केला.