Haris Rauf Wife : आफ्रिदीनंतर सगळ्यात जास्त शिव्या खाणारा हरिस रौफ कोण? बायको आहे सौंदर्याची खाण, पाहा Photos
Haris Rauf Wife Muzna Masood Malik : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले.
Continues below advertisement
Haris Rauf Wife Muzna Masood Malik
Continues below advertisement
1/9
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती.
2/9
भारताला शेवटच्या षटकात 10 धावांची आवश्यकता होती आणि हरिस रौफ गोलंदाजी करण्यासाठी आला, परंतु तिलक वर्मा दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून सामना संपवला. हरिसने सामन्यात एकही विकेट न घेता 50 धावा दिल्या.
3/9
केवळ अंतिम पराभवच नव्हता, तर हरिस रौफच्या वर्तनामुळेही टीका तीव्र झाली. सुपर-4 टप्प्यात, त्याने भारतीय चाहत्यांकडे विमान पडून हावभाव केला होता. या कृत्यासाठी त्याला त्याच्या सामन्याच्या फीच्या 30% दंड ठोठावण्यात आला.
4/9
अंतिम सामन्यातील त्याच्या खराब कामगिरीनंतर, लोकांनी सोशल मीडियावर त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आणि आफ्रिदीनंतर सगळ्या जास्त शिव्या हरिस रौफला दिल्या.
5/9
हरिस रौफची पत्नी मुजना मसूद मलिक हिने पण काही दिवसा आधी इन्स्टाग्रामवर एक भडकाऊ पोस्ट टाकली होती, ज्यावरून वाद निर्माण झाला.
Continues below advertisement
6/9
मुजना मसूद मलिकचा जन्म रावळपिंडी येथे झाला आहे. ती एक फॅशन मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.
7/9
मुजना हिच्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत आणि तिने अनेक नामांकित ब्रँड्ससाठी मॉडेलिंग केली आहे.
8/9
यांच्या प्रेमकहाणीला कॉलेजपासून सुरू झाली. इस्लामाबाद येथील इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटीमध्ये दोघांची ओळख झाली, हळूहळू ती घट्ट मैत्रीत रूपांतरित झाली आणि शेवटी त्यांनी एकमेकांवर प्रेम करायला सुरुवात केली.
9/9
मुजना मसूद मलिकने टिकटॉकवरही मोठी फॅन फॉलोइंग तयार केली आहे. तिच्या मॉडेलिंग करिअरमुळे तिला अनेक पाकिस्तानी चित्रपटांत झळकण्याची संधी मिळाली. याशिवाय, मुजनाने फॅशन डिझाइनिंग क्षेत्रातही काही काळ काम केले आहे.
Published at : 29 Sep 2025 01:16 PM (IST)