धोनी पुन्हा एकदा चर्चेत, पण फायदा मात्र Candy Crush चा; कारण काय?
कॅप्टन कूल धोनी इंडिगो फ्लाईटमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. धोनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये धोनीच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकलीच पण, हा व्हिडीओ आणखी एका कारणामुळे चर्चेत आला.
फ्लाईटमध्ये धोनी टॅबवर गेम खेळताना नेटकऱ्यांच्या लक्षात आलं आणि चाहत्यांनाही हा गेम खेळण्याचा मोह आवरता आला नाही. यामुळे गेम कंपनीचा मात्र मोठा फायदा झाला.
जगभरात असे अनेक खेळाडू आहेत जे लक्झरी लाईफस्टाईल जगतात आणि प्रवासासाठी खाजगी जेट किंवा बिझनेस क्लासमध्ये प्रवास करतात, पण चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी अत्यंत साधेपणाने जीवन जगतो.
धोनीच्या सरळ आणि साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. धोनी रविवारी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसला. या दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धोनी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं.
या फ्लाईटदरम्यान धोनी आपल्या टॅबलेटवर आरामात कँडी क्रश खेळत बसला होता.
धोनीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर, ट्विटरवर कँडी क्रश ट्रेंड होऊ लागला. ट्विटरवर एक ट्वीट व्हायरल होत आहे, या ट्वीटमध्ये मोबाईल गेमिंग ऍप्लिकेशनने दावा केला आहे की, 3 दशलक्षाहून अधिक लोकांनी फक्त तीन तासांमध्ये कँडी क्रश अॅप डाउनलोड केला.
धोनीमुळ कँडी क्रश गेम पुन्हा एकदा चर्चेत आला. कँडी क्रश 2014-2015 या वर्षातील सर्वात लोकप्रिय गेम होता. या काळात हा गेम खूप लोकप्रिय होता. अनेक लोक बस, मेट्रो किंवा ट्रेनमध्ये कँडी क्रश खेळताना दिसत होते.