Kane Williamson : संघाला मोठा धक्का; IND vs NZ तिसऱ्या सामन्यातून स्टार खेळाडू बाहेर
न्यूझीलंड संघाने भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. किवी संघाने प्रथमच भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना मुंबईच्या मैदानावर 1 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. पण आता मालिका जिंकल्यानंतर न्यूझीलंडसाठी एक वाईट बातमी आली आहे. केन विल्यमसन दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, केन विल्यमसन मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतात येणार नाही. याआधी दुखापतीमुळे तो पहिल्या दोन कसोटी सामन्यातही खेळला नव्हता.
न्यूझीलंड 28 नोव्हेंबरपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे, ज्यासाठी तो तंदुरुस्त राहण्याची आणि पुनर्वसन सुरू ठेवण्याची आशा करेल. आतापर्यंत त्याने न्यूझीलंडसाठी 102 कसोटी सामन्यांमध्ये 8881 धावा केल्या आहेत ज्यात 32 शतकांचा समावेश आहे.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात रचिन रवींद्रने उत्कृष्ट शतक झळकावले आणि 134 धावांची खेळी खेळली. त्याच्यामुळेच किवी संघ पहिला सामना अगदी सहज जिंकण्यात यशस्वी ठरला.
दुसऱ्या कसोटीत मिचेल सँटनरने अप्रतिम कामगिरी केली. त्याने सामन्यात एकूण 13 विकेट घेतल्या आणि भारतीय संघासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरला. या दोन्ही खेळाडूंनी न्यूझीलंडसाठी स्वबळावर मालिका जिंकली आहे.