Dinesh karthik: दिनेश कार्तिकचा नवा पराक्रम, मोडला धोनीचा खास विक्रम!
भारत दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 4th T20) यांच्यात काल (17 जून 2022) चौथा टी-20 सामना खेळण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजकोट टी-20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 82 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली.
भारताच्या विजयात यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिकनं महत्वाची भूमिका बजावली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात दिनेश कार्तिकनं भारतीय संघासाठी 55 धावांचं योगदान दिलं. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक ठोकत दिनेश कार्तिकनं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढलाय.
या सामन्यात दिनेश कार्तिकनं त्याच्या टी-20 कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक झळकावलं. तसेच सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कार्तिकनं 55 धावा करत धोनीचा खास विक्रम मोडीत काढला. धोनीनं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद 52 धावांची खेळी केली होती.
दिनेश कार्तिकने 2022 आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. आयपीएलमधील विस्फोटक फंलदाजीच्या जोरावर कार्तिकनं पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन केलं.