India vs New Zealand Final: रोहित शर्मा आज शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार?; टीम इंडियाचे आणखी दोन खेळाडू निवृत्ती जाहीर करणार असल्याची चर्चा

India vs New Zealand Final Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदापासून एक पाऊल दूर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज (9 मार्च) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना दुबईमध्ये खेळला जाईल. दोन्ही संघ यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.

एका वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना हा कर्णधार रोहित शर्माचा शेवटचा एकदिवसीय सामना असू शकतो. यानंतर रोहित निवृत्त होऊ शकतो. रोहितसोबतच या यादीत टीम इंडियाचे आणखी दोन खेळाडू आहेत.
एबीपी न्यूजला मिळालेल्या बातमीनुसार, रोहित टीम इंडियाचे कर्णधारपद सोडू शकतो.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर बीसीसीआय संघाची सूत्रे दुसऱ्या खेळाडूकडे सोपवू शकते.
अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
रोहितसोबतच विराट कोहली आणि रवींद्र जडेजा देखील एकदिवसीय फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतात.
कोहली सध्या फॉर्ममध्ये आहे आणि चांगली कामगिरीही करत आहे. पण त्याआधी तो अनेक सामन्यांमध्ये खेळला नव्हता. यामुळे कोहलीला टीकेचा सामनाही करावा लागला. जडेजा आणि कोहलीच्या निवृत्तीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.