India vs England 3rd Test: टीम इंडियाचे 10 खेळाडू ज्याला नडले; सामना जिंकताच त्याने काय केले?, PHOTO

India vs England 3rd Test: इंग्लंडने तिसरा कसोटी सामना 22 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.

India vs England 3rd Test

1/9
Ind vs Eng: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या लॉर्ड्स कसोटीचा पाच दिवसांचा थरार संपला आहे.
2/9
इंग्लंडने तिसरा कसोटी सामना 22 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
3/9
7 व्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेला रवींद्र जडेजा याने एकाकी लढा देत विजयासाठी संघर्ष केला. जडेजा 61 धावांवर नाबाद राहिला.
4/9
मोहम्मद सिराज बाद होताच जडेजाच्या चेहऱ्यावरील शल्य पाहून चाहते हळहळले. तसेच जडेजाही भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.
5/9
एकीकडे मोहम्मद सिराज बाद होताच इंग्लंडच्या सगळ्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन सुरु केले. मात्र दुसरीकडे मोहम्मद सिराज एकाच बसून होता.
6/9
मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाला पाहून जॅक क्रॉली लगेच त्यांच्या जवळ गेला आणि त्यांनी विजयी केलेल्या विजयी संघर्षाबाबत कौतुक केले.
7/9
दरम्यान, या कसोटीच्या तिसऱ्या दिवस अखेर लॉर्ड्सवर मोठा ड्रामा पाहायला मिळाला होता.
8/9
लॉर्ड्स कसोटी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी 6-7 मिनिटांचा कालावधी बाकी होता. त्यामुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरणं भाग होतं. इंग्लंडकडून बेन डकेट आणि जॅक क्रॉलीची जोडी फलंदाजीला उतरली.
9/9
यावेळी क्रॉली मैदानात वेळ घालवत होता. त्यामुळे शुभमन गिलसह दहा खेळाडू क्रॉलीच्या अंगावर धावून गेले होते. मात्र इंग्लंडने सामना जिंकताच क्रॉलीने मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाकडे धाव घेत दोघांचे कौतु केले.
Sponsored Links by Taboola