In Pics : भारतीय क्रिकेटर्स झिम्बाब्वेसाठी रवाना; तीन एकदिवसीय मालिकांसाठी सज्ज
वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-0 ने तर पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 ने जिंकल्यानंतर भारत आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
यावेळी केएल राहुल कर्णधार असून तो दुखापतीतून सावरुन संघाचं नेतृत्त्व सावरण्यासाठी सज्ज झाल्याचंही बीसीसीआयने सांगितलं आहे.
दरम्यान भारत आणि झिम्बाब्वे (Zimbabwe Vs India) यांच्यातील पहिल्या सामन्याला काही दिवस शिल्लक असल्याने भारतीय खेळाडू झिम्बाब्वेला रवाना झाले आहेत. बीसीसीआयनं याबाबतचे फोटो देखील शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये भारतीय खेळाडू खास भारतीय संघासाठीच्या विमानात दिसल्याचं दिसून येत आहे.
युवा खेळाडूंची फौज या फोटोंमध्ये दिसत आहे, ज्यात शिखर धवन हा एक अनुभवी क्रिकेटरही आहे.
ऋतुराज गायकवाडला संधी मिळेल का? तसंच राहुलला खेळायला मिळेल का? याकडे अनेकांचे लक्ष आहे.
या दौऱ्यात भारताचे नियमित मुख्यप्रशिक्षक राहुल द्रविडला विश्रांती देण्यात आलीय. यामुळं या दौऱ्यात भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दौऱ्यात विराट-रोहित असे दिग्गज खेळाडू नसल्याने भारतीय संघाची धुरा युवा खेळाडूंवर असेल.
अशामध्ये अंतिम 11 मध्ये नेमकी कोणा-कोणाला संधी मिळेल हे देखील पाहावे लागेल.