IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यापूर्वी भारतीय संघ मैदानात, कसून सुरु आहे सराव
Ind vs SA
1/10
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) सामन्यांसाठी दोन्ही संघ तयार झाले असून मैदानावर कसून सराव करताना दिसत आहेत. (P.C. BCCI)
2/10
ज्यामध्ये सर्व खेळाडू सराव करताना दिसत असून कोच राहुल द्रविड कर्णधार केएल राहुलसह इतर खेळाडूंना खास टीप्स देताना दिसत आहे.(P.C. BCCI)
3/10
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच टी20 सामन्यांची मालिका पार पडणार असून मालिकेचा पहिला सामना दिल्ली येथे 9 जून रोजी खेळवला जाणार आहे.(P.C. BCCI)
4/10
या सामन्यांसाठी भारताने सराव सुरु केला आहे. रोहित शर्माच्या जागी केएल राहुल संघाचा कर्णधार असणार असून बऱ्याच युवा खेळाडूंना देखील या वेळी संधी देण्यात आली आहे. (P.C. BCCI)
5/10
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू दिनेश कार्तिक बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन करणार असून त्याच्याकडून संघाला अधिक अपेक्षा आहेत.(P.C. BCCI)
6/10
भारताचे सर्व खेळाडू सराव करतानाचे सर्व फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन पोस्ट केले आहेत.(P.C. BCCI)
7/10
युवा गोलंदाज आवेश खानला राहुल द्रविड काही खास टीप्स देतानाचा फोटोही बीसीसीआयने पोस्ट केला आहे.(P.C. BCCI)
8/10
युवा गोलंदाज अर्शदीप सिंह हा देखील दिग्गज खेळाडू भुवनेश्वरकडून टीप्स देताना दिसत आहे.(P.C. BCCI)
9/10
सर्वच युवा खेळाडूंवर या मालिकेदरम्यान विशेष लक्ष असणार आहे.(P.C. BCCI)
10/10
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहा सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. यंदा केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली भारत काय कमाल करणार हे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहा सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. यंदा केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली भारत काय कमाल करणार हे पाहाव लागेल.(P.C. BCCI)
Published at : 07 Jun 2022 05:52 PM (IST)