Team India : रोहित शर्माचे पाच शिलेदार पाकिस्तानवर ठरणार भारी, कोहली ते बुमराह पाकचं टेन्शन वाढवणार
रोहित शर्मानं पाकिस्तान विरुद्ध टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाच सामन्यांमध्ये 68 धावा केल्या आहेत. रोहितनं 17 च्या सरासरीनं आणि 121.42 च्या सरासरीनं धावा केल्या असून पाक विरुद्ध त्याच्या सर्वाधिक धावा 30 आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविराट कोहलीनं टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध 308 धावा केल्या आहेत. विराटनं ही कामगिरी 5 मॅचमध्ये केली आहे. विराटनं या धावा 308 च्या सरासरीनं केल्या आहेत. तर त्याचं स्ट्राईक रेट 132.75 इतकं आहे. विराटनं टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक 82 धावा केल्या आहेत.
हार्दिक पांड्यानं पाकिस्तान विरुद्ध टी20 वर्ल्ड कपमध्ये 25.50 च्या सरासरीनं 113.33 च्या स्ट्राईक रेटनं 51 धावा केल्या आहेत. पाकिस्तान विरुद्ध त्याची टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावसंख्या 40 आहे. हार्दिकनं पाकिस्तानच्या चार विकेट घेतल्या आहेत. त्यानं 30 धावा देत 3 विकेट घेतल्या ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
जसप्रीत बुमराहनं पाकिस्तान विरुद्ध टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन सामन्यांमध्ये एक विकेट घेतली आहे. तर, इथर सामन्यांमध्ये तीन मॅचेसमध्ये दोन विकेट घेतल्या आहेत. भारताचा प्रमुख गोलंदाज म्हणून तो रिंगणात आहे.
कुलदीप यादवला उद्या पाकिस्तान विरुद्ध संधी मिळू शकते. कुलदीप यादवनं पाकिस्तान विरुद्ध सहा वनडे मॅचमध्ये 12 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळं उद्याच्या मॅचमध्ये संधी मिळाल्यास कुलदीप यादव पाक विरुद्ध दमदार कामगिरी करु शकतो.