Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : तिसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत, पण मालिका भारतानं 1-0 ने जिंकली
भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. अशामध्ये नुकतीच टी20 मालिका संपली असून मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण मालिकेतील दुसरा सामना भारतानं जिंकला होता, तर पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला असल्याने अखेर मालिका भारताने 1-0 ने जिंकली आहे.
तिसरा सामना नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे भारताला संपूर्ण 20 ओव्हर खेळता आल्या नाहीत.
9 ओव्हरमध्ये 75 रन करु शकला, ज्यानंतर अखेर डीएलएस अर्थात डकवर्थ लुईस मेथडनुसार (DLS Method) निकाल काढण्यात आला आणि हा सामना सामना बरोबरीत सुटला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडनं 160 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर भारताची फलंदाजीची सुरुवात खराब झाली. 4 गडी स्वस्तात बाद झाले. पण 9 व्या षटकात पाऊस आला आणि सामना थांबवण्यात आला.
सुरुवातीला न्यूझीलंडचे गडी तंबूत परतल्यावर डेवॉन कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्सनं संयमी तसंच फटकेबाजीने सुरुवात करत संघाचा डाव सावरला.
दोघांनी संघाची धावसंख्या 100 पार पोहोचवली. दोघांनीही अर्धशतकं ठोकली असून डेवॉन कॉन्वेने 59 आणि ग्लेन फिलिप्सनं 54 धावा केल्या. त्यानंतरचे फलंदाज मात्र अगदी पटापट बाद होत गेले. नीशाम, मिल्ने आणि ईश सोधी हेतर शून्यावर बाद झाले. भारताच्या अर्शदीप सिंहनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. सिराजनंही 4 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेलनही एक विकेट घेतली.
161 धावांचं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. ईशान किशन 10, ऋषभ पंत 11 आणि सूर्यकुमार 13 धावा करुन तंबूत परतले. श्रेयस अय्यरतर खातंही खोलू शकला नाही.
मग कर्णधार हार्दिकनं काहीशी फटकेबाजी करत 18 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या, दीपक हुडानंही नाबाद 9 धावा केल्या, ज्यामुळे 9 ओव्हरमध्ये भारतानं 75 रन केले. ज्यानंतर पाऊस आला आणि सामना थांबवला, अखेर काही वेळानंतर डीएलएस मेथडनं निकल काढण्यात आला आणि सामना बरोबरीत सुटला.