IND vs ENG, R Ashwin : अश्विनने तिसऱ्या कसोटीतून घेतली माघार,कौटुंबिक इमर्जन्सीमुळे सामना अर्ध्यावर सोडून घरी परतला
पण काही तासानंतर अश्विनने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. कौटुंबिक कारणामुळे तिसरा कसोटी सामना अर्ध्यावर सोडत अश्विन चेन्नईला परतला आहे.(Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजकोट कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 445 धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडकडून भारताच्या या धावसंख्येला जोरदार प्रयुत्तर देण्यात आले. (Photo Credit : PTI)
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने दोन बाद 207 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)इंग्लंडचा संघ अद्याप 238 धावांनी पिछाडीवर आहे.
मोक्याच्या क्षणी अश्विन नसल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. आता भारतीय संघाकडे फक्त चार गोलंदाजांचा पर्याय उपलब्ध राहिलाय. (Photo Credit : PTI)
रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव या दोघांवर फिरकीची धुरा असेल. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. (Photo Credit : PTI)
त्याशिवाय यशस्वी जायस्वाल हा गोलंदाजीचा पर्याय रोहित शर्माकडे असेल. तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा कोणती रणनिती करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.(Photo Credit : PTI)
अश्विन राजकोट कसोटी अर्ध्यावर सोडून चेन्नईला आपल्या घरी परतलाय. बीसीसीआयनं मध्यरात्री अश्विनने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतल्याचं सांगितलं. बीसीसीआयकडून अश्विनच्या या निर्णयाचं कारणही सांगण्यात आलेय. (Photo Credit : PTI)
बीसीसीआयनं ट्वीट करत सांगितलं की, अश्विन कौटुंबिक एमेरजन्सीमुळे सामना अर्ध्यावर सोडून घरी परतला आहे. या कठीण परिस्थितीमध्ये खेळाडू आणि बीसीसीआय अश्विनसोबत आहेत. गरज पडल्यास बीसीसीआयकडून अश्विनला शक्य ती मदत केली जाईल.(Photo Credit : PTI)