In Pics : पहिल्या कसोटीत भारताचा बांगलादेशवर 188 धावांनी मोठा विजय, मालिकेतही 1-0 ची आघाडी
बांगलादेश दौऱ्यातील पहिला कसोटी सामना भारतानं तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया विजयासह भारतानं मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
विशेष म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्रीसाठी भारतानं सर्व आगामी कसोटी सामने जिंकणं महत्त्वाचं असल्याने त्याची सुरुवात चांगली झाली आहे.
ज्यानंतर कुलदीपनं कमाल गोलंदाजी करत 5 तर सिराजनं 3 विकेट घेत अवघ्या 150 धावांवर बांगलादेशचा डाव आटोपला.
ज्यानंतर पुजारा आणि गिलच्या शतकाच्या जोरावर भारतानं 258 धावा करत दुसरा डाव घोषित केला आणि 513 धावांचं मोठं आव्हान बांगलादेशला दिलं.
सामन्यात भारतानं पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराच्या 90 तर श्रेयस अय्यरच्या 86 धावांच्या जोरावर 404 धावसंख्या स्कोरबोर्डवर लावली.
हे लक्ष्य पूर्ण करताना बांगलादेशनं झुंज दिली पण अखेर कुलदीप आणि अक्षर यांच्या फिरकीसमोर बांगलादेशचा संघ 324 धावांवर सर्वबाद झाला आणि भारत 188 धावांनी सामना जिंकला.
आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
सामान्यात भारताच्या सर्वच खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. फलंदाजी, गोलंदाजी तसंच क्षेत्ररक्षणही चांगलं केल.
पुजारा, गिल यांच्या शतकामुळं भारताचा कसोटी संघ पुन्हा फॉर्मात आल्याचं दिसून येत आहे.
सामनावीर म्हणून सर्व डावात कमाल गोलंदाजी तर पहिल्या डावात महत्त्वूर्ण फलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादवला गौरवण्यात आलं.