In Pics : रोहित ब्रिगेड नागपुर कसोटीसाठी सज्ज, बीसीसीआयनं शेअर केले खास फोटो

भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ यांच्यात उद्यापासून (9 फेब्रुवारी) बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेला सुरुवात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यामालिकेत एकूण 4 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्रीसाठी ही मालिका जिंकणं दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचं आहे.

दरम्यान मालिकेतील पहिला सामना महाराष्ट्राच्या नागपुर शहरात होणार आहे.
नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएश क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
या सामन्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संघ कसून सराव करत आहेत.
बीसीसीआयनं खेळाडूंच्या सरावाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
भारतीय वेळेनुसार सामना 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 120 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 30 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 43 सामने जिंकले आहेत. याशिवाय 28 सामने ड्रॉ झाले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे.
दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यात भारत तीन फिरकीपटूंना घेऊन मैदानात उतरु शकतो, नेमकी अंतिम 11 नाणेफेकीनंतरच समजणार आहे.