IND vs SA, 2nd Test : रत्नागिरी To दक्षिण आफ्रिका, महाराष्ट्राच्या अल्लाउद्दीन पालेकरची आंतरराष्ट्रीय 'पंच'गिरी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पंच अल्लाउद्दीन पालेकर (Allahudein Palekar) सर्वाधिक चर्चेत राहिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाचे कारण पालेकर हा भारतीय वंशाचा असून त्याच गाव रत्नागिरी आहे.
दक्षिण आफ्रिकेतच वाढलेला अलाउद्दीनची पाळंमुळं रत्नागिरीतच असून नुकतचं त्याने पहिल्यांदाच कसोटी सामन्यात पंचगिरी केली.
आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात अल्लाउद्दीन पालेकर यांनी क्रीडा चाहत्यांना प्रभावित केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून पंचगिरी करणारा अल्लाउद्दीन पालेकर हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड इथला आहे.
44 वर्षीय पालेकर याने 2014-15 मध्ये वानखेडे मैदानावर रणजी सामन्यात पंचगिरी केली होती.
44 वर्षीय अल्लाउद्दीन 2006 पर्यंत दक्षिण आफ्रिकेमधील टायटन्स संघाकडून क्रिकेटही खेळला आहे.
अल्लाउद्दीन पालेकर हा दक्षिण आफ्रिकेचा 57 वा पंच असून जगभरातील 497 वे पंच ठरला आहे.