IND vs SA : दिनेश कार्तिकच्या जागी 'या' खेळाडूला द्या संधी'; गौतम गंभीरचा सल्ला
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात असून यासाठी बीसीसीआयने आयपीएलमधील गाजवलेल्या दिनेश कार्तिकला संधी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याने यंदा आरसीबीकडून दमदार फलंदाजी केल्याने त्यांची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. पण भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आता दिनेशच्या जागी दीपक हुडाला (Deepak Hooda) संधी द्या असं वक्तव्य केलं आहे.
पहिल्या टी20 सामन्यात तब्बल 212 धावाचं आव्हान देऊनही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे आता दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाला आणखी तगडी टक्कर द्यावी लागू शकते. अशामध्ये अंतिम 11 मध्ये काही बदल देखील करावे लागू शकतात.
याबद्दलच बोलताना गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली. त्याने दिनेशच्या जागी दीपक हुडाला संधी देण्याचा सल्ला दिला. तसंच युवा फिरकीपटू रवी बिश्नोईला ही संधी दिली जाऊ शकते, असंही तो म्हणाला.
दरम्यान दिनेशने आरसीबीकडून आयपीएल गाजवल्यामुळे त्याला संघात पुन्हा स्थान मिळालं असलं तरी केवळ एका सामन्यानंतर त्याला बाहेर बसवण्याची मागणी गौतम करत आहे.
पहिल्या सामन्यातही कार्तिकला केवळ दोन चेंडू खेळायला मिळाले, ज्यात त्याने एक धाव केली आहे. ज्यामुळे त्याला आणखी संधी मिळल्यास तो स्वत:ला सिद्ध करु शकतो.
आगामी टी20 विश्वचषकासाठी संघनिवड करण्याच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे.
त्यामुळे कार्तिकने चांगली कामगिरी केल्यास त्याला विश्वचषक खेळण्याची संधी देखील मिळू शकते.
पण आता उर्वरीत सामन्यात त्याला संधी मिळणार का? आणि मिळाल्यास तो कशी कामगिरी करेल यावर या प्रश्नांचं उत्तर मिळेल.
दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राईकरेटने 16 सामन्यात 330 धावा केल्या.