IND vs SA : दिनेश कार्तिक अंतिम 11 मध्ये खेळणार? काय म्हणतोय राहुल द्रविड

दिनेश कार्तिक

1/10
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांसाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी संघाची घोषणा केली. यावेळी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली असून बऱ्याच खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीमुळे त्यांची संघात निवड झाली आहे. त्यामुळे भारताचा दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिकही संघात परतला आहे.
2/10
त्याने यंदा आरसीबीकडून दमदार फलंदाजी केल्याने त्यांची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे.
3/10
दरम्यान आता त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष असून याबाबत संघाचा कोच राहुल द्रविडने एक सूचक वक्तव्य केलं.
4/10
दिनेश कार्तिकच्या संघातील रोलबाबत बोलताना कोच राहुल द्रविड म्हणाला,''दिनेश कार्तिकचा रोल स्पष्ट आहे. दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये त्याच्या संघाकडून एक उत्तम फिनीशर म्हणून कामगिरी केली. त्यामुळेच त्याची टीम इंडियात पुन्हा एन्ट्री झाली आहे.''
5/10
दरम्यान द्रविडच्या या वक्तव्यामुळे कार्तिक एक फिनीशर म्हणून संघात असण्याची दाट शक्यता आता वर्तविली जात आहे. 
6/10
दिनेशने यंदा आयपीएलमध्ये अगदी चांगली कामगिरी केली एक फिनिशर सोबत त्याने यष्टीरक्षक म्हणूनही चांगली कामगिरी केली.
7/10
दिनेश कार्तिकचा स्ट्राईक रेट अगदी जबरदस्त असल्याचं यावेळी दिसून आलं.
8/10
संघासाठी त्याने अगदी चांगली कामगिरी केल्याने काही सामन्यात दिनेशच्या जीवावर संघाने विजय मिळवला.
9/10
दिनेशने आयपीएल 2022 मध्ये 16 सामन्यात 183.33 स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या.
10/10
यावेळी नाबाद 66 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.
Sponsored Links by Taboola