Yuzvendra Chahal Dhanashree Verma : अरे देवा, एवढी मोठी रक्कम! युजवेंद्र चहलने धनश्रीला दिले इतके कोटी रुपये? जाणून घ्या कशी झाली सेटलमेंट

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेचा विषय बनले आहेत. आता याच दरम्यान एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दाव्यानुसार, चहलने धनश्री वर्मासोबत सेटलमेंट केला आहे. या सेटलमेंटसाठी चहलने धनश्री वर्माला कोट्यवधी रुपये दिले आहेत.

खरंतर, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, चहलने धनश्री वर्माशी सेटलमेंट करण्यासाठी तिला 60 कोटी रुपये दिले आहेत.
सोशल मीडियावर आतापर्यंत अनेक दावे केले गेले आहेत, त्यापैकी बहुतेक चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे.
त्याच वेळी, 60 कोटी रुपयांच्या सेटलमेंट दाव्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आता चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात काय निर्णय होतो हे पाहणे रंजक ठरेल.