किंग कोहलीच्या नावावर गोलंदाजीचा खास रेकॉर्ड, असा करणार एकमेव खेळाडू
Virat Kohli : विराट कोहली भारतीय संघातील आघाडीचा गोलंदाज आहे. त्याच्यावर नावावर फलंदाजीत अनेक विक्रम आहेत. पण त्याशिवाय गोलंदाजीतही विराटच्या नावावर खास विक्रम आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVirat Kohli’s Record : विराट कोहलीने फलंदाजीत एकापेक्षा एक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांचा पल्ला त्याने नुकताच पार केला.
विराट कोहली कधी कधी गोलंदाजी करतानाही दिसतो. गोलंदाजीत त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. असा विक्रम करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. टी 20 क्रिकेटमध्ये त्याने हा कारनामा केलेला आहे.
विराट कोहलीने एकही चेंडू न टाकता विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. हा चेंडू त्याचा टी20 क्रिकेटमधील पहिला चेंडू होता. या चेंडूवर त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याला बाद केले होते.
झालं असे की, विराट कोहलीने तो चेंडू वाइड फेकला होता, त्यावर विकेटच्या मागे धोनीने पीटरसनला स्टंपिंग केले. अशापद्धतीने कोहलीने एकही चेंडू न फेकता विकेट घेतली.
असा पराक्रम करणारा विराट कोहली क्रिकेटमधील पहिला गोलंदाज ठरला. सध्या विराट कोहली बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत खेळत आहे.
विराट कोहली याने आतापर्यंत 106 कसोटी, 271 वनडे आणि 115 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 25 हजार धावांचा पाऊस पाडला.