IN PICS : पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंचा पगार किती?
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम हा ए कॅटेगरीमध्ये आहे. बाबरला वार्षिक पगार 1.25 मिलियन पाकिस्तानी रुपये दिले जातात. भारतीय रुपयात ही किंमत 50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तान सुपर लीगमध्ये बाबर आजम पेशावर जालिमी संघाचा भाग आहे. पीएसएलमध्ये बाबरला 1.24 कोटी रुपये दिले जातात.
पाकिस्तानी संघातील विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिजवानही ए कॅटेगरीमध्ये आहे. रिझवानचा पगारही 1.25 मिलियन पाकिस्तानी रुपये आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि विकेटकीपर मोहम्मद रिझवान याच्याशिवाय शाहीन शाह आफ्रिदीही ए कॅटेगरीमध्ये आहे. त्यालाही 1.25 मिलियन पाकिस्तानी रुपये दिले जातात.
त्याशिवाय पाकिस्तानच्या क्रिकेटरला वनडे सामन्यासाठी प्रति मॅच 4,68,815 पाकिस्तानी रुपये दिले जातात. तर टी 20 साठी 3,72,075 रुपये दिले जातात.