ऋषभ पंतचे शतक व्यर्थ, निर्णायक सामन्यात भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका संघाने मालिका जिंकली

South Africa vs India 3rd Test: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णयाक कसोटी सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागलाय. या पराभवासह भारताचं दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारतानं दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेनं सात विकेट्स राखून पूर्ण केलंय.

भारतानं कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर जोरदार कमबॅक करत दक्षिण अफ्रिकेने सलग दोन सामने जिंकत मालिका खिशात घातलीय.
दुसऱ्या डावात ऋषभ पंत याने दमदार शतकी खेळी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूला पंतला कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही.
दक्षिण अफ्रीकासाठी कीगन पीटरसन (Keegan Petersen) याने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली.
भारतीय गोलंदाजांना २१२ धावांचे आव्हान रोखता आले नाही. परिणामी दक्षिण आफ्रिकामध्ये जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.