IND vs ENG: भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना किती पगार मिळतो, कुणाची सॅलरी जास्त ?
इंग्लंड क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना वेगवेगळ्या स्तरावर करारबद्ध करते. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची वेगळ्या श्रेणी आहेत. मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणाऱ्यांची श्रेणी वेगळी आहे आणि दोन्हीकडे खेळणाऱ्यांचे करारही वेगळे आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंग्लंडमधील कोणताही क्रिकेटपटू जो कसोटी आणि मर्यादीत षटकांचे सामने खेळतो, त्याला वार्षिक 9 लाख पौंड (9.10 कोटी) पगार दिला जातो. बीसीसीआयच्या सर्वोच्च श्रेणीतील 'ए प्लस'पेक्षा ही रक्कम 2 कोटी रुपये जास्त आहे. भारतात विराट, रोहित आणि बुमराह यांसारख्या क्रिकेटपटूंना ‘ए प्लस’ श्रेणीत समाविष्ट केलेय. त्यांना वर्षाला सात कोटी रुपये मिळतात.
इंग्लंडमधील क्रिकेटपटू जे फक्त कसोटी क्रिकेट खेळतात. त्याला वार्षिक 6.5 लाख पौंड (6.55 कोटी रुपये) पगार मिळतो. बीसीसीआयच्या दुसऱ्या श्रेणी म्हणजेच 'ए 'कॅटेगरीपेक्षा ही रक्कम दीड कोटी रुपये जास्त आहे. भारतात ‘ए’ श्रेणीतील क्रिकेटपटूंना वर्षाला पाच कोटी रुपये मिळतात.
इंग्लंडमध्ये मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना 2.5 ते 3.5 लाख पौंड (2.53 ते 3.54 कोटी रुपये) वार्षिक वेतन दिले जाते. बीसीसीआयच्या 'बी' आणि 'क' श्रेणीतील करार असलेल्या खेळाडूंना अनुक्रमे 3 आणि 1 कोटी रुपये वार्षिक वेतन दिले जाते. म्हणजे इथेही इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना जास्त पगार मिळतो.
मॅच फीच्या बाबतीत इंग्लंडचे खेळाडू आणि भारतीय खेळाडू जवळपास सारखेच आहेत. इंग्लंडच्या खेळाडूंना कसोटी सामन्यासाठी 14,500 पौंड (14.65 लाख रुपये) आणि एकदिवसीय आणि टी20 साठी 4500 पौंड (4.55 लाख रुपये) मिळतात. तर भारतीय क्रिकेटपटूंना कसोटीसाठी 15 लाख रुपये, वनडेसाठी ६ लाख रुपये आणि टी-२०साठी तीन लाख रुपये मानधन मिळते.