Australia : इंग्लंड-स्कॉटलँड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, पॅट कमिन्स- मिशेल स्टार्कला वगळलं, आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूला संधी
ऑस्ट्रेलिया सप्टेंबर महिन्यात स्कॉटलँड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया स्कॉटलँड विरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंड विरुद्ध 3 टी 20 सामने आणि 5 एकदिवसीय सामने होणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियानं या दौऱ्यासाठी संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाला वनडे वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या पॅट कमिन्सला संघात स्थान दिलेलं नाही.
ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व मिशेल मार्श करणार आहे.पॅट कमिन्स आणि मिशेल मार्शला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली कॅपिटल्स कडून आयपीएल गाजवणाऱ्या जॅक फ्रेजर मॅक्गर्क ला टी 20 आणि वनडे संघात स्थान देण्यात आलं आहे. जॅक फ्रेजर मॅक्गर्क, स्पेन्सर जॉन्सन, जेवियर पार्टलेट आणि आरोन हार्डी, कॅमरुन ग्रीन, नॅथन एलिस आणि जोश इंग्लिस यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. ग्लेन मॅक्सवेलला वनडे मॅचेससाठी संघात स्थान मिळालंय.
ऑस्ट्रेलियाचा टी 20 संघ :मिशेल मार्श (कॅप्टन), जेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेविड, नाथन एलिस, जॅक फ्रेजर-मॅक्गर्क, कॅमरून ग्रीन, आरोन हार्डी, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, मार्कस स्टोइनिस, अॅडम झाम्पा.
ऑस्ट्रेलियाची वनडे टीम: मिशेल मार्श (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कैरी, नाथन एलिस, जॅक फ्रेजर-मॅक्गर्क, आरोन हार्डी, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, अॅडम झाम्पा.