Champions Trophy 2025 Ind vs Pak: जय शाह, राजीव शुक्ला, रवी शास्त्री अन् पाकिस्तानचा शोएब अख्तर...; भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी दुबईत काय घडलं?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची स्पर्धा (Champions Trophy 2025) 19 फेब्रुवारीपासून सुरु झाली असून 9 मार्च रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील हायव्होलटेज सामना म्हणजेच भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan Playing XI) सामना आज (23 फ्रेब्रुवारी) रंगणार आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याआधी दुबईत एक भव्य समारंभ झाला. यादरम्यानचा एका फोटो समोर आला आहे. या फोटोबाबत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
सदर समारंभात आयसीसीचे अध्यक्ष जय शाह, बीसीसीआयचे राजीव शुक्ला, भारतीय समालोचक रवी शास्त्री आणि पाकिस्तानचा समालोचक शोएब अख्तर एकत्र आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सलमान आघा, तैयब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.