Rishabh Pant Injury Update : लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियाला 'बॅड न्यूज' धडकली; दुखापतीमुळे ऋषभ पंत बाहेर? बीसीसीआयने दिली अपडेट

BCCI Update on Rishabh Pant Injury : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीला 10 जुलैपासून लॉर्ड्सवर सुरुवात झाली.

BCCI Update on Rishabh Pant Injury

1/8
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीला 10 जुलैपासून लॉर्ड्सवर सुरुवात झाली.
2/8
पहिल्याच दिवशी गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
3/8
दुखापतीमुळे ऋषभ पंत मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी ध्रुव जुरेलला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून बोलावण्यात आले.
4/8
दिवसाच्या दुसऱ्या सत्रात दुखापत झाल्यानंतर ऋषभ पंत मैदानाबाहेर गेला.
5/8
तेव्हापासून चाहत्यांच्या मनात तो मैदानात कधी परतणार असा प्रश्न आहे.
6/8
दरम्यान, बीसीसीआयने ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत एक मोठी अपडेट जारी केली आहे.
7/8
बीसीसीआयने म्हटले आहे की, 'टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंतच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे.
8/8
बीसीसीआयने पुढे म्हटले की, सध्या तो उपचार घेत आहे आणि वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली आहे. ऋषभच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल विकेटकीपिंग करत आहे.'
Sponsored Links by Taboola