Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs South Africa : भारतीय कसोटी संघ सरावात रमला, सेन्चुरियन मैदानातील फोटो BCCI कडून शेअर
आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. पहिला सामना सेन्चुरियन मैदानात 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने सराव करण्यास सुरुवात केली आहे. बीसीसीआयने खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये श्रेयसपासून सर्व खेळाडू दिसत आहेत. (Photo:@BCCI/Twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळणारा जयंत यादव यंदा भारतीय कसोटी संघात निवडला गेला असून त्याच्याकडून अष्टपैलू खेळीची अपेक्षा केली जात आहे. (Photo:@BCCI/Twitter)
अनुभवी चेतेश्वर पुजारा फॉर्ममध्ये नसल्याने त्याला या दौऱ्यात संधी मिळणार का? आणि मिळाल्यास तो संधीचे सोने करणार का? हे पाहावे लागेल. (Photo:@BCCI/Twitter)
आर आश्विनकडून संघाला बऱ्याच अपेक्षा असून त्याच्याकडून महत्त्वाचे विकेट्स मिळवण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल. (Photo:@BCCI/Twitter)
संघाचा कर्णधार विराट आणि नवनिर्वाचित उपकर्णधार केएल राहुल हे एक चांगली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. (Photo:@BCCI/Twitter)
या दौऱ्याला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. सर्वात आधी कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या सेन्चुरियन मैदानात पहिला सामना खेळवला जाईल. (Photo:@BCCI/Twitter)
अभिमन्यु ईश्वरन हा युवा फलंदाजही बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे. (Photo:@BCCI/Twitter)
गोलंदाजी विभागाचा प्रमुख जसप्रीत बुमराहकडून कर्णधार विराटला सर्वाधिक अपेक्षा असणार आहेत. त्यामुळे बुम बुम बुमराह कमाल करणार का? हे पाहावे लागेल. (Photo:@BCCI/Twitter)