BCCI Central Contract: बीसीसीआयच्या 'वार्षिक करार'मध्ये पहिल्यांदाच 5 खेळाडूंचा समावेश; किती पैसे मिळणार?

BCCI Central Contract: विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा ग्रेड ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने एकूण 4 श्रेणींमध्ये 34 खेळाडूंचा समावेश केला आहे.

Continues below advertisement

BCCI Central Contract

Continues below advertisement
1/7
बीसीसीआयने 2024-25 हंगामासाठी (1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025) वार्षिक करार जाहीर केला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा ग्रेड ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. बोर्डाने एकूण 4 श्रेणींमध्ये 34 खेळाडूंचा समावेश केला आहे.
2/7
बीसीसीआयच्या 'वार्षिक करार'मध्ये असे ५ खेळाडू आहेत ज्यांना बीसीसीआयने पहिल्यांदाच केंद्रीय करार यादीत समाविष्ट केले आहे.
3/7
वेगवान गोलंदाज हर्षित राणाला पहिल्यांदाच बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत स्थान मिळाले आहे. त्याचा समावेश सी ग्रेडमध्ये आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती. हर्षितने भारतासाठी 2 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 1 टी-20 सामना खेळला आहे. या करारातून हर्षित राणाला 1 कोटी रुपये मिळतील.
4/7
नितीश कुमार रेड्डीचा देखील पहिल्यांदाच बीसीसीआयचा केंद्रीय करारात समावेश करण्यात आला आहे. सी ग्रेडमध्ये नितीश रेड्डीला स्थान मिळालं आहे. नितीशने भारतासाठी 5 कसोटी आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 298 आणि 98 धावा केल्या आहेत. या करारातून नितीश रेड्डीला 1 कोटी रुपये मिळतील.
5/7
अभिषेक शर्माने देखील गेल्या काही सामन्यात टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. अभिषेक शर्माने केवळ आयपीएलमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने त्याच्या आक्रमक फलंदाजीने प्रभावित केले आहे. अभिषेक शर्माने भारतासाठी 17 टी-20 सामन्यांमध्ये 535 धावा केल्या आहेत, ज्यात 2 शतकांचा समावेश आहे. अभिषेकचाही सी ग्रेडमध्ये समावेश आहे, त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारामधून 1 कोटी रुपये मिळतील.
Continues below advertisement
6/7
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयात वरुण चक्रवर्तीने महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने 3 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता आणि त्याला केंद्रीय करार मिळणे निश्चित मानले जात होते. वरुण चक्रवर्तीला सी ग्रेडमध्ये स्थान मिळालं आहे. त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारामधून 1 कोटी रुपये मिळतील.
7/7
गेल्या वर्षीही 28 वर्षीय आकाश दीपच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण यावर्षी पहिल्यांदाच त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारात समाविष्ट करण्यात आले. आकाश दीपचा समावेश सी ग्रेडमध्ये करण्यात आला आहे, त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारामधून 1 कोटी रुपये मिळतील. आकाश दीपने भारतासाठी 7 कसोटी सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत.
Sponsored Links by Taboola