Rohit Sharma : भारताकडे 2025 च्या आशिया कपचं आयोजकपद, रोहित शर्मा अन् विराट कोहली खेळू शकणार नाहीत कारण...
भारतानं 2023 मध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यावेळी भारताचा कॅप्टन रोहित शर्मा होता. 2025 मध्ये आशिया कपचं आयोजन भारतात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतात होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळं खेळू शकणार नाहीत.
आशिया कप स्पर्धेत आशियातील संघ सहभागी होतात, यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, नेपाळ यासह इतर संघांचा समावेश असतो. 2026 मध्ये टी 20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून भारतात होणारी आशिया कप स्पर्धा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.
भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळं भारतात होणाऱ्या आशिया कपमध्ये दोघेही खेळताना दिसणार नाहीत.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचं कर्णधारपद सूर्यकुमार यादव कडे सोपवण्यात आलं आहे. त्यामुळं आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्त्व करताना पाहायला मिळू शकतो.