Asia Cup 2023 : मोहम्मद सिराजची आग ओकणारी 'ती' ओव्हर...

आशिया चषकाच्या फायनल सामन्यात मोहम्मद सिराज याने आग ओकणारी गोलंदाजी केली आहे. सिराजच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. मोहम्मद सिराज याने श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडलेय.

सिराज आणि बुमराह यांच्या माऱ्यापुढे श्रीलंका संघाचा अवस्था दारुण झाली आहे. सिराज याने एकाच षटकात चार विकेट घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले.
मोहम्मद सिराज याने एकापाठोपाठ एक विकेट घेत आशिया चषकाच्या फायनल सामन्यात दमदार कामगिरी केली. सिराजच्या माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाज फेल ठरले.
टीम इंडियाने श्रीलंकेला 50 रन्सवर ऑल आऊट केले. मोहम्मद सिराजने भारतासाठी दमदार गोलंदाजी केली. त्याने 7 षटकात 21 धावा देत 6 बळी घेतले.
सिराजनेही एक षटक मेडन टाकले. हार्दिक पांड्याने 2.2 षटकात 3 धावा देत 3 बळी घेतले. बुमराहने एक विकेट घेतली. त्याने 5 षटकात 23 धावा दिल्या.
श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ धावा केल्या. हेमंताने 13 धावा केल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. तर चार फलंदाजांन दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. निसांका २, परेरा ०, समरविक्रमा ० असंलका ०, डी सल्वा ४ आणि शनाका ० धावांवर तंबत परतले.