Abhishek Sharma Ind vs Ban : 200+ स्ट्राईक रेटने अभिषेकचा कहर, युवराज सिंगच्या रेकॉर्डला गवसणी, रोहित-राहुलला मागे टाकलं
Abhishek Sharma Ind vs Ban : अभिषेक शर्मा याने बांगलादेशविरुद्ध भारतासाठी दमदार खेळी केली. अवघ्या 37 चेंडूत त्यांनी 202.70 च्या स्ट्राईक रेटने 75 धावा ठोकल्या.

Abhishek Sharma Ind vs Ban News
1/8
अभिषेक शर्मा याने बांगलादेशविरुद्ध भारतासाठी दमदार खेळी केली.
2/8
अवघ्या 37 चेंडूत त्यांनी 202.70 च्या स्ट्राईक रेटने 75 धावा ठोकल्या.
3/8
या झंझावाती खेळीत त्याने 5 षटकार आणि 6 चौकार ठोकले.
4/8
या सामन्यात 200 च्या वरच्या स्ट्राईक रेटने धावा करून अभिषेकने युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली तसेच केएल राहुल आणि रोहित शर्माचा विक्रम मोडला.
5/8
या सामन्यात अभिषेक शर्मा यांनी 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळत 50+ धावा केल्या आणि ही त्याची टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील अशी पाचवी वेळ ठरली.
6/8
अगदी युवराज सिंगनेही टी-20 मध्ये 5 वेळा 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 50+ धावा केल्या आहेत.
7/8
रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी प्रत्येकी 4 वेळा असा पराक्रम केला आहे.
8/8
या यादीत सूर्यकुमार यादव सर्वात पुढे असून त्यांनी तब्बल 10 वेळा 200+ स्ट्राईक रेटने 50+ धावांची खेळी केली आहे.
Published at : 24 Sep 2025 09:44 PM (IST)