Shravan Somwar 2020 | हिंगोलीतील ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे महापूजा संपन्न
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक सण-उत्सन रद्द करण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरिसरातील भाविक मंदिराच्या दोनशे मीटर अंतरावरुनच कळसाचे दर्शन घेऊन माघारी परतत आहेत.
देवस्थानचे व्यवस्थापक व मंदिर पुजारी पुरोहित या मोजक्याच लोकांमध्ये महापूजा संपन्न झाली.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या श्रावणी सोमवारी देखील मंदिर परिसरात शुकशुकाट पसरला आहे.
भगवान शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विधिवत पूजा पार पडली.
देशावरील कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर होऊ दे आणि या देशातील बळीराजाला सुख-समृद्धी येऊ दे, अशी या देवस्थानचे मुख्य पुजारी तुळजा दास भोपी आणि देवस्थानचे व्यवस्थापक शंकर काळे यांनी देवाकडे प्रार्थना केली.
दरवर्षी श्रावणी सोमवारी भगवान शंकराच्या दर्शनासाठी लाखो भाविक औंढा नागनाथ येथे गर्दी करत असतात.
आज श्रावणातील दुसरा श्रावणी सोमवार. यानिमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आठवं ज्योतिर्लिंग नागेश दारुकावणे येथे भगवान शंकरावर दुग्धाभिषेक करत महापूजा पार पडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -