शाहिद कपूरचं पत्नी मीराला 56 कोटींचं आलिशान घर गिफ्ट; पंचतारांकित हॉटेलला लाजवेल असे INSIDE फोटो पहा

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शाहिद कपूरचा आगामी चित्रपट जर्सी आहे. यापूर्वी शाहिद कपूर अखेर कबीर सिंह चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

मीरा 21 वर्षांची होती जेव्हा तिने शाहिद कपूरशी लग्न केले. तिने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून इंग्रजी ऑनर्समध्ये पदवी प्राप्त घेतली आहे.
लग्नाच्या दिवसापासूनच शाहिद कपूर आणि मीरा राजपूतची लव्ह लाईफ चांगली चालली आहे. 2016 मध्ये मीराने एका वर्षानंतर मुलीला जन्म दिला, जिचे नाव तिने मीशा ठेवले आहे. तर वर्ष 2018 मध्ये मीराने एका मुलाला जन्म दिला ज्याचे नाव त्याने जैन ठेवलंय.
नवरा-बायको दोघेही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात. ते सहसा आपल्या मुलांची आणि कुटुंबातील इतरांची छायाचित्रे, व्हिडिओ शेअर करतात.
शाहिद कपूर आणि मीरा यांनी 7 जुलै 2015 ला लग्नगाठ बांधली. शाहिद आणि मीराचे लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे.
त्याचे हे अपार्टमेंट 42 व्या आणि 43 व्या मजल्यावर आहे. शाहिदचे हे दुसरे घर आहे. याआधी शाहिदचा जुहूमध्ये एक आलिशान बंगला आहे.
वृत्तानुसार असे सांगितले जात आहे की वरळी येथे असलेल्या या अपार्टमेंटची किंमत 55 कोटी 60 लाख रुपये आहे आणि शाहिदने यासाठी सरकारला 2 कोटी 91 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.
शाहिद कपूरने हे घर तिच्या पत्नीला दुसऱ्या गरोदरपणात गिफ्ट केले होते. शाहिदच्या या घराची किंमत 56 कोटी असल्याचे सांगितले जाते.
घराच्या आत आणि बाहेर हिरव्यागार गोष्टींची विशेष काळजी घेण्यात आली आहे, जे वातावरण ताजे ठेवते.
घराला आतून भव्य पेंटिंग्ज आणि फर्निचरने सजविले आहे. या घरात शाहिद कपूर पत्नी मीरा आणि दोन्ही मुलांसमवेत राहतो.
शाहिद आणि मीराचे घर सी फेसिंग आहे. अशा परिस्थितीत समुद्राचे दृश्य घराच्या छतावरुन स्पष्ट दिसते. या फोटोत तुम्ही पाहु शकता की शाहिद आणि मीरा यांचे घर टूरिस्ट स्पॉट हॉटेलसारखेच दिसत आहे.
या दोघांचे घर आतूनही फार सुंदर आहे. सुंदर पडद्यांसह इंटेरिअर मनमोहक आहे. जिथे मीरा अनेकदा तिचे जबरदस्त आकर्षक फोटो क्लिक करते.
शाहिद आणि मीराच्या घराचा सर्वात नेत्रदीपक भाग म्हणजे त्यांच्या घराचा टेरेस. शाहिद आणि मीरा बर्याचदा घराच्या टेरेसवर एकमेकांशी क्वालिटी वेळ घालवतात, जे त्यांच्या इन्स्टाग्रामवर पहायला मिळेल.
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर हे बी टाऊनच्या फरफेक्ट जोडप्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. शाहिद आणि मीराची पार्श्वभूमी एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. मात्र, विवाहानंतर दोघांनी ज्या प्रकारे एकमेकांनुसार स्वत: ला बदलले ते कौतुकास्पद आहे. आम्ही तुम्हाला शाहिद आणि मीराच्या भव्य घराची काही छायाचित्रे दाखवणार आहोत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -