Sara Ali Khan | सारा अली खानचे नवे फोटो पाहिले का?

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप कमी वेळात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर आतापर्यंत ती बर्याच चित्रपटांमध्ये दिसली आहे. (Photo Credit- Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चाहत्यांना तिचा अभिनय आणि नृत्य खूप आवडते. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असतात. इन्स्टाग्रामवर तिचे 29 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करते. (Photo Credit- Manav Manglani)

सारा अली खानची काही छायाचित्रे समोर आली आहेत, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रांमध्ये अभिनेत्री अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसली आहे. ही छायाचित्रे बॉलिवूडचे प्रसिद्ध छायाचित्रकार मानव मंगलानी यांनी शेअर केली आहेत. कमेंट्स करून चाहत्यांनी सारा अली खानच्या लूकचे कौतुक केले आहे. (Photo Credit- Manav Manglani)
सारा अली खानची ही छायाचित्रे जिमच्या बाहेरची आहेत. चित्रांमधून अभिनेत्रीची वेगळी स्टाईल आणि ग्लॅमरस लूक पाहण्यासारखा आहे. सारा अली खान तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. अभिनेत्री आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत राहत असते. (Photo Credit- Manav Manglani)
सारा अली खान वरुण धवनसोबत 'कुली नंबर 1' मध्ये अखेरीस दिसली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करण्यास अपयशी ठरला. सारा लवकरच 'अतरंगी रे' चित्रपटात दिसणार आहे. (Photo Credit- Manav Manglani)
या चित्रपटात अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. या दोन कलाकारांसमवेत सारा अली खान पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाकडून मोठ्या आशा आहेत. (Photo Credit- Manav Manglani)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -