Republic Day PM Modi Looks | प्रजासत्ताक दिनाला पंतप्रधानांची जामनगरच्या पगडीला पसंती, 2015 पासून मोदींचा लूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी खास पगडीची निवड केली आहे. यंदा त्यांनी गुजरातच्या जामनगरची खास पगडी परिधान केली आहे. जामनगरच्या राजघराण्याकडून त्यांना ही पगडी भेट म्हणून दिली आहे. मोदी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला वेगवेगळ्या पगडी किंवा फेटा परिधान केल्याचे दिसतात. मागील वर्षी त्यांनी बांधणीचा फेटा बांधला होता. केशरी रंगाच्या या फेट्यात पिवळा रंगही होता. 2015 पासून आतापर्यंतच्या प्रत्येक प्रजासत्ताक दिनाला मोदींनी खास प्रकारच्या पगडी किंवा फेटा परिधान केल्याचं दिसलं होतं. प्रजासत्ताक दिनी राजपथावरील परेड जेवढी चर्चेत असते तेवढाच मोदींचा लूकही चर्चेत राहिला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाच्या (2021) प्रजासत्ताक दिनाला जामनगरची पगडी : 72व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जामनगरची पगडी परिधान केली आहे. त्यांनी इंडिया गेटवरील 'नॅशनल वॉर मेमोरियल'ला भेट देऊन देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांना आदरांजली वाहिली. त्यांच्यासोबत तीन दलाचे प्रमुखही उपस्थित होते.
2020 बांधणीचा फेटा : पंतप्रधानांनी 71व्या प्रजासत्ताक दिनाला 'बांधणी'चा फेटा निवडला होता. केशरी रंगाचा हा फेटा होता.
2019 मध्ये पिवळ्या रंगांचा फेटा : 70व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी पिवळ्या रंगाचा फेटा परिधान केला होता. त्यामध्ये हिरवा आणि सोनेरी रंगही होता. यावेळी त्यांनी पांढऱ्या कुर्त्यावर बंदगळ्याचं स्लीव्हलेस जॅकेट परिधान केलं होतं.
2018 मध्ये मल्टीकलर फेटा : 2018 मध्ये 69व्या प्रजासत्ताक दिनाला पंतप्रधानांनी परिधान केलेल्या फेट्यामध्ये विविध रंगांचा समावेश होता. त्या वर्षी पंतप्रधांनी क्रीम कलरचा कुर्ता आणि बंदगळ्याचं काळं जॅकेट घातलं होतं.
2017मध्ये गुलाबी रंगाचा फेटा : 68 व्या प्रजासत्ताक दिनाला मोदींचा फेटा गुलाबी रंगाचा होता आणि त्याला चंदेरी रंगाची किनार होती. पांढऱ्या ठिपके असलेलं काळ्या रंगाचं जॅकेट पांढऱ्या कुर्त्यावर त्यांनी परिधान केलं होतं.
2016 मध्ये पिवळ्या रंगाच्या फेट्याला पसंती : 2016 मध्ये 67व्या प्रजासत्ताक दिनाला पंतप्रधान मोदींनी लाल रंगांच्या बारीक रेषा असलेला पिवळ्या रंगाचा फेटा घातला आहे. यावर्षी त्यांनी स्लीव्हलेस जॅकेट न घालता डार्क क्रीम रंगाचा बंदगळ्याचा फूल स्लीव्हचा सूट घातला होता.
2015 मध्ये पहिल्या प्रजासत्ताक दिनी मोदींचा मल्टीकलर फेटा : देशाचे पंतप्रधान म्हणून आपल्या पहिल्यावहिल्या प्रजासत्ताक दिनाला नरेंद्र मोदी यांनी मल्टीकलर फेट्याला पसंती दिली. या सोहळ्याला पंतप्रधानांनी 'बांधणी'चा फेटा त्यांनी काळ्या रंगाच्या सूटवर परिधान केला होता. 66व्या प्रजासत्ताक दिनाला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -