Republic Day parade | यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राम मंदिराची झलक पाहायला मिळणार!
केरळचा चित्ररथ - केरळमध्ये 61 टक्के नारळाचे उत्पादन घेण्यात येते तर नारळापासून वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन घेण्यात येते. केरळच्या चित्ररथामध्ये नारळांचा वापर करण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकचा चित्ररथ - पवनपुत्र हनुमानाचे जन्मस्थान समजल्या जाणार्या हंपीच्या अंजना देवी टेकडीवरील उग्र नरसिंम्हाला दाखवण्यात येणार आहे. चित्ररथावर 1509 च्या विजयनगर साम्राज्याचा सम्राट कृष्णदेवरायांचा राजा अभिषेक आणि राम मंदिराच्या हजारो भाविकांना यावर दाखवण्यात येणार आहे.
55 वर्षांनंतर प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात मुख्य पाहुणे म्हणून कोणताही परदेशी मान्यवर सामील होणार नाही. प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी दर्शकांना पास किंवा तिकिटांची आवश्यकता आहे. परेडचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो लोक जमतात. मात्र, यंदा कोरोनामुळे यावर मर्यादा आली आहे.
दरवर्षी 1 लाखाहून अधिक लोकांच्या तुलनेत यंदा राजपथ येथे केवळ 25 हजार लोकांनाच परेडमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचवेळी केवळ 4,000 सामान्य लोकांना परवानगी असेल, उर्वरित प्रेक्षक व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी अतिथी असतील.
कोरोना विषाणूमुळे यावेळी प्रजासत्ताक दिनाचा उत्सव वेगळा दिसणार आहे. राजपथ येथील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील प्रेक्षकांच्या संख्येवरही यावेळी मर्यादा असणार आहे.
आयुष मंत्रालयाचा चित्ररथ - या रथात चारक संहिताने वेढलेले आचार्य चरक दाखवण्यात आले आहे. ज्याभोवती विविध प्रकारच्या औषधी वनस्पती दिसत आहेत.
उत्तराखंडचा चित्ररथ - उत्तराखंड राज्यातील कलाकारांनी पारंपरिक वेशभूषेत राष्ट्रीय नाट्यगृहात एक मनोहारी कार्यक्रम सादर केला. उत्तराखंड राज्याने यंदा केदारखंड हा विषय निवडला आहे.
मंत्रालयांच्या चित्ररथात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, कामगार व रोजगार मंत्रालय, अपंगत्व सशक्तीकरण विभाग, आयुष मंत्रालय, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), जैव तंत्रज्ञान विभाग, माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (सीपीडब्ल्यूडी) यांचा समावेश आहे. ट्रॅक्टरच्या सुरूवातीस थ्री डी एएल रोबोटचे मॉडेल डिजिटल क्रांती दर्शविते. झोळीमध्ये भीम अॅप, ई संजीवनी, ई विद्या इत्यादी दिसतील. शेवटी, देशाचा नायक म्हणून ओळखल्या जाणार्या आरोग्य अॅपला सर्वात जास्त ठेवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशची चित्ररथ - प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये यावर्षी राम मंदिराची झलक पाहायला मिळणार आहे. उत्तर प्रदेशचा सांस्कृतिक वारसा अयोध्या थीमवर आधारित असेल. या चित्ररथात अयोध्येत होणारा दीपोत्सव तसेच अयोध्येत नुकत्याच झालेल्या सहा लाख दिव्याच्या प्रकाशयोजनाची गिनीज बुक रेकॉर्डदेखील दाखवला जाणार आहे.
मंत्रालयांच्या चित्ररथांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, कामगार व रोजगार मंत्रालय, अपंगत्व सशक्तीकरण विभाग, आयुष मंत्रालय, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), जैव तंत्रज्ञान विभाग, माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (सीपीडब्ल्यूडी) यांचा समावेश आहे. सांस्कृतिक मंत्रालयाचीही यावेळी चित्ररथ पहायला मिळणार आहे.
यावर्षी आपल्याला 32 राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळतील, ज्यात वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ, मंत्रालयाची प्रतिकृती आणि महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. यावर्षी - लडाख, गुजरात, आसाम, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तराखंड, छत्तीसगड, पंजाब, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्किम, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश या राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळणार आहेत.
दरवर्षी 26 जानेवारीला म्हणजेच भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून असते. यावेळचा प्रजासत्ताक दिन अनेक प्रकारे भिन्न असणार आहे. देश कोरोनाशी लढत असतानाचा हा पहिलाच प्रजासत्ताक दिन असणार आहे. यावेळी राजपथावर अयोध्येत उभारण्यात येणार भव्य राम मंदिराची झलक पाहायला मिळणार आहे. उत्तर प्रदेशातून आलेल्या राम मंदिराच्या मॉडेलचा राजपथावरील परेडमध्ये समावेश केला जाणार आहे. यूपीने यावेळी अयोध्येचा सांस्कृतिक वारसा साकारला आहे. 2021 च्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ही परेड विशेष होणार आहे. प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी देखील असतील. सॅनिटायझर, फेस मास्क आणि ग्लोव्हजचीही व्यवस्था केली जाणार आहे.
72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर यंदा 32 चित्ररथ दिसणार आहेत. सुरक्षा मंत्रालयामार्फत राष्ट्रीय रंगशाळा शिबीर, नवी दिल्ली येथील विविध राज्यांच्या चित्ररथांची झलक माध्यमांसमोर सादर केली आहे. 23 जानेवारीला राजपथावर रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत आपापल्या राज्यांची सांस्कृतिक झलक माध्यमांसोर सादर करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -