Rahul Gandhi at Kerala : मासेमारीसाठी थेट पाण्यातच उतरले राहुल गांधी!
मासेमाऱ्य़ांना येणाऱ्या अ़चणींवर काँग्रेस नक्की मदत करेल आणि निवडणुकीदरम्यानच्या घोषणापत्रात या मुद्द्याचा आवर्जून समावेश करेल असं आश्वासन राहुल यांनी मासेमाऱ्यांना दिलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमासेमाऱ्यांसोबत बोलता बोलता राहुल गांधी हे नावेत बसून समुद्राची सफर करायला गेले, केवळ फिरायलाच नाही तर त्यांनी पाण्यात उतरून मासेमारीदेखील केली. जाळं फेकत त्यांनी मासेमाऱ्यांना हातभार लावला, मात्र ते एक स्क्वीड हा मासा पकडू शकले.
मी तुमचं काम, तुमच्या समस्या समजू शकतो, त्याचा आदरही करतो. अनेकदा असं होतं की आम्ही मच्छी खाणारे विचारही करत नाही की हे मासे पकडताना किती संकटांना तुम्हा मच्छिमाऱ्यांना सामोरं जावं लागत असेल.
राहुल गांधींनी मासेमाऱ्यांना सांगितलं की त्यांचा काँग्रेस पक्ष हा विधानसभा निवडणुकांमध्ये मासेमाऱ्यांसाठी घोषणापत्रात मुद्दा समाविष्ट करेल.
केरळमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. थांगस्सेरी किनाऱ्यावर राहुल यांनी हजारो मच्छिमाऱ्यांसोबत संवाद साधला. वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी मच्छिमाऱ्यांचं काम निरखून पाहिलं, खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणं त्यांच्या जीवासाठी किती धोक्याचं आहे हे त्यांनी जाणून घेतलं.
मासेमाऱ्य़ांना येणाऱ्या अडचणींवर काँग्रेस नक्की मदत करेल आणि निवडणुकीदरम्यानच्या घोषणापत्रात या मुद्द्याचा आवर्जून समावेश करेल असं आश्वासन राहुल यांनी मासेमाऱ्यांना दिलं.
मासेमाऱ्यांचं आयुष्य नेमकं कसं आहे हे पाहण्यासाठी त्यांनी स्वत: मासेमारी केली, राहुल गांधी यासाठी स्वत: थेट पाण्यात उतरले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -