PHOTO | प्रेग्नंट अनुष्का शर्माचं Vogue मॅगझिनसाठी फोटोशूट
स्वत:साठी शेअर करतेय, आयुष्यभरासाठी. वोग इंडिया हे फोटोशूट करताना मजा आली, असं कॅप्शन अनुष्काने फोटो शेअर करताना दिलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनुष्का आणि विराट लवकरच बाबा बनणार आहेत. अनुष्का शर्माची प्रसुती जानेवारी महिन्यात होणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावं यासाठी पॅटर्निटी लीव्ही घेऊन विराट भारतात परतला आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अनुष्का आणि विराटनं सोशल मीडियाच्या आधारे त्यांच्या जीवनात येणाऱ्या या नव्या पाहुण्याची माहिती सर्वांनाच दिली होती. ज्यानंतर या जोडीवर अमाप शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
अनुष्काचे हे फोटो पाहिल्यानंतर कमेंट करण्याचा मोह विराटलादेखील आवरता आला नाही. विशेष म्हणजे अनुष्काने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोवर त्याने कमेंट केली आहे. विराटने सुंदर अशी कमेंट केली आहे.
जानेवारी 2021 च्या एडिशनसाठी हे फोटोशूट केले आहे. अनुष्काचे हे बेबी बंपसोबतचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.
अनुष्काने तिचे हे लेटेस्ट फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. अनुष्काने 'वोग' या प्रसिद्ध मासिकासाठी हे फोटोशूट केले आहे. यातील काही फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी अत्यंत उत्सुक आहेत. अनुष्का सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन तिच्या गरोदरपणाचा प्रवास सर्वांच्या भेटीला आणत आहे. आता प्रेग्नंट अनुष्काने नुकतेच वोग मॅगझिनसाठी फोटोशूट केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -