PHOTO | उपराष्ट्रपती म्हणून शपथबद्ध झाल्यानंतर कमला हॅरिस यांच्या भारतातील मूळ गावी जल्लोष
भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या महिला, भारतीय वंशाची व्यक्ती आहेत. कमला हॅरिस अमेरिकेच्या 45 व्या उपराष्ट्रपती ठरल्या आहे. कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान भारतातील तामिळनाड येथील थुलसेंद्रपूरम येथे जल्लोष साजरा करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकमला हॅरिस यांनी लहान वयात भारत दौरा केला होता. त्यांच्यावर त्यांच्या आजोबांचा फार प्रभाव होता, जे भारतात मोठे सरकारी अधिकारी होते. त्यांच्या आजोबा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी झाले होते.
कमला हॅरिस यांचे मामा गोपालन बालाचंद्रन दिल्लीच्या मालवीय नगर येथे राहतात.
तामिळनाडूच्या थुलसेंद्रपूरम गावात कमला हॅरिस यांच्या आजोबांच घर आहे. कमला हॅरिस जेव्हा पाच वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्या थुलसेंद्रपूरम येथे आजोबांना भेटण्यासाठी गेल्या होत्या.
यादरम्यान, लहान मुलंही कमला हॅरिस यांचे फोटो हातात घेऊन बागडताना दिसली. तसेच शपथविधी सोहळ्यानंतर लहान मुलांना चॉकलेट्सही वाटण्यात आली.
कमला हॅरिस निवडणूक जिंकल्यानंतरपासूनच त्यांचं आजोळ असलेल्या थुलसेंद्रपूरममध्ये उत्सवाचं वातावरण होतं.
तामिळनाडूतील थुलसेंद्रपूरम गावातील दुकानांमध्येही कमला हॅरिस यांचे फोटो लावण्यात आले होते. कमला हॅरिस यांच्यासोबतच राष्ट्रपती जो बायडन यांचेही फोटो गावात लावल्याचं पाहायला मिळाले.
कमला हॅरिस यांची आई भारतीय आणि वडिल जमेकाई वंशाचे आहेत. त्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदी विराजमान होणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकन आहेत. कमला हॅरिस या 56 वर्षांच्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -