Photos: देशद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी कंगनाचा वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब, कडक सुरक्षेमध्ये समोर आले हे फोटो
बांद्रा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला होता. हायकोर्टने कंगणाला आठ जानेवारी रोजी आपला जबाब नोंद करावा असा आदेश दिला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर कंगनाने समाजात तेढ निर्माण होईल असे काही ट्वीट केले होते असे तिच्याविरोधातील याचिकेत म्हटले होते.
हायकोर्टच्या आदेशानुसार कंगना आणि रंगोलीने वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जबाब नोंद केला. कंगनाच्या जबाबावेळी तिचे वकील रिजवान सिद्दीकी उपस्थित होते.
पेशाने कास्टिंग डायरेक्टर असणाऱ्या मुंबईतील साहिल सय्यद नावाच्या व्यक्तीने वांद्रे कोर्टात कंगनाच्या विरोधात देशद्रोह, धार्मिक तेढ वाढवणे, समाजात द्वेष निर्माण करणे या आरोपाखाली एक याचिका दाखल केली होती
या प्रकरणी कंगनावर आयपीसी कलम 153 ए, कलम 295 ए आणि कलम 124 ए अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कंगना आपली बहीण रंगोली सोबत वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. पोलीस स्टेशनमध्ये येण्यापूर्वी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपला आवाज दाबण्यात येतोय असा आरोप तिने केला.
समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी कंगनाच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेऊ वांद्रे कोर्टाने कंगनाच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असा आदेश मुंबई पोलिसांना दिला होता.
संबंधित माहिती प्राप्त झाल्यानंतरच पोलीस पुढचा तपास करुन कोर्टात अहवाल सादर करतील आणि कोर्टाच्या पुढील आदेशाप्रमाणे पोलीस कारवाई करतील.
वांद्रे पोलिसांनी कंगनाचा जबाब नोंद केला आहे. तसेच तिने ज्या सोशल माध्यमांमध्ये या पोस्ट शेअर केल्या होत्या त्यांच्याकडे या संबंधी अधिक माहिती मागवली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -