बिहार आणि आसाममध्ये पुराचा हाहाकार! पाहा मन सुन्न करणारे फोटो
गोलपाडावर पुरस्थितीचा सर्वात जास्त प्रभाव दिसून आला. येथे 4.62 लाख लोकांवर पुरस्थितीचा परिणाम झाल्याचं दिसून आलं. तर बारपेटा आणि मोरिगावमध्ये क्रमशः 3.81 लाख आणि तीन लाख लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या 24 तासांत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि जिल्हा प्रशासनाने 97 लोकांना वाचवलं आहे.
आसाममधील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे होणार्या घटनांमध्ये 103 आणि भूस्खलनात 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील गोलाघाट जिल्ह्यातील बोकाहाटमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे यावर्षी पुरस्थिती आणि भूस्खलन यांमुळे एकूण 129 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आसाममध्ये पुरपरिस्थितीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
आसाममध्ये सध्या पुरपरिस्थितीमध्ये काही प्रमाणात सुधारणा होताना दिसत आहे. येथील 33 पैकी 22 जिल्ह्यांमध्ये 22.34 लाख लोकांवर पुरस्थितीचा परिणाम झाला आहे.
पुरस्थिती ओढावलेल्या भागांतून आतापर्यंत 1.67 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं गेलं आहे.
आसाममध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) 17 पथकं आणि एसडीआरएफची आठ पथकं बचाव कार्य करत आहेत.
सीतामढी, शिवहर, सुपौल, किशनगंज, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, पश्चिम चंपारण, पूर्वी चंपारण, खगडिया आणि सारण या गावांवर पुराचा परिणाम झाला आहे.
दरभंगा जिल्ह्यात जवळपास 14 तालुक्यांमध्ये 8.87 लोख लोक पुरपरिस्थितीमुळे विस्थापित झाले आहेत.
बुलेटीनमध्ये सांगण्यात आलं आहे की, 11 जिल्ह्यांमधील 93 गावांतील 765 पंचायतींमधील 24.42 लाख लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
बिहारमधील सरकारच्या वतीने एक बुलेटीन जारी करण्यात आलं. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, पुरामुळे 11 जिल्ह्यांमधील आणखी काही भागांत पुराचं पाणी शिरल्यामुळे 10 लाखांहून अधिक लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
बिहारमध्ये पुरस्थितीमुळे 11 जिल्ह्यांमधील काही गावांमध्ये सोमवारी पाणी शिरलं. त्यामुळे तेथील परिस्थिती आणखी बिघडली.
आसाम आणि बिहारमधील पूर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. बिहारमध्ये एकीकडे कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. तर दुसरीकडे पूराचा धोका वाढत आहे. राज्यात आतापर्यंत पूरामुळे जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. 11 जिल्ह्यांमधील जवळपास 15 लाख लोकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशीच काहीशी परिस्थिती आसाममध्येही आहे. आसाममध्ये आतापर्यंत जवळपास 27 लाख लोक पूर परिस्थितीचा सामना करत आहेत. राज्यात पुरस्थिती उद्भवल्यापासून आतापर्यंत जवळपास 120 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाहुयात या पूरस्थितीचे हृदयद्रावक फोटो...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -