Photo | लोणार सरोवराच्या पाहणीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं फोटोशूट
मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि. प. अध्यक्ष मनिषाताई पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती आदींसह पुरातत्व विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोणार सरोवर हे ज्याप्रमाणे वन पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे वैज्ञानिकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. पर्यटकांसाठी या ठिकाणी सरोवराच्या वरच्या बाजूला एक पायरस्ता ठरवावा. या रस्त्यावर पर्यटकांना थांबण्यासाठी स्थळे विकसित करावी. सरोवराच्या चारही बाजूला अशी व्यवस्था झाल्यास पर्यटकांनाही सोयीचे होईल, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
या ठिकाणची वनसंपदा धोक्यात येऊ नये, यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा. लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करता येऊ शकतो काय याचीही पडताळणी करावी, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार येथील सरोवराची वनकुटी व्ह्यू पॉईंटवरून पाहणी केली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली.
लोणार सरोवर भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये सरोवराचे फोटोही घेतले.
सरोवर परिसरात मंदिरांची संख्या अधिक आहे, त्यामुळे या ठिकाणी वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी विकास करताना नेमका कोणत्या पद्धतीने करावा, याचा विचार एकत्रितरित्या करण्यात यावा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -